crime 
सोलापूर

धक्कादायक ! वांगरवाडीत भर दिवसा चिमुकल्याचा खून; महिलेला बांधून लुटले दागिने

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : वांगरवाडी (ता. बार्शी) येथे भर दिवसा घरकाम करीत असताना चोरट्याने घरात घुसून नऊ महिन्यांच्या मुलाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला, तर महिलेला बांधून तिचे मणिमंगळसूत्र लुटून फरार झाला आहे. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात  'त्या' चोरट्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

या घटनेत सार्थक स्वानंद तुपे (वय नऊ महिने) या बाळाचा मृत्यू झाला असून, त्याचे चुलते आनंद तुपे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अश्विनी तुपे असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना वांगरवाडी येथे शनिवारी दुपारी दीडच्या दरम्यान घडली. वांगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ तुपे कुटुंब राहण्यास असून, महिलेचे सासू, सासरे शेतामध्ये गेले होते. अश्विनी यांचे पती ट्रकचालक असून बाहेरगावी गेले होते तर दीर आनंद तुपे कामानिमित्त बार्शीत होते. घरात अश्विनी होत्या. त्यांचा मोठा मुलगा बाहेर खेळण्यास गेला होता. 

सार्थकला पाळण्यात झोपवून अश्‍विनी पीठ चाळत बसल्या असतानाच मोठ्याने रडण्याचा आवाज आल्याने त्या पळत गेल्या. त्या वेळी पांढरा बनियन, काळी हाफपॅंट घातलेला एक चोरटा सार्थकचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळत होता. त्यास अश्विनी यांनी अडवून 'तुम्हाला काय घेऊन जायचे ते घेऊन जा, पण माझ्या मुलाला मारू नका' अशी विनवणी केली. त्या वेळी चोरट्याने त्यांना ढकलून देऊन 'शांत बस नाही तर तुझ्या मुलाला जिवंत मारीन' अशी धमकी देत त्याने चिमुकल्या सार्थकला जमिनीवर टाकले. त्या वेळी तो रडला नाही. अश्विनी यांचे साडीने पाय बांधले व तोंडात बोळा कोंबून आवाज बंद केला. घरातील कपाट उघडून कपडे खाली टाकले. अश्विनी यांचे चार ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र गळ्यातून खेचून घेऊन समोरच असलेल्या मक्‍याच्या शेतातून पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ जमा झाले. पोलिस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरा एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तान्ह्या सार्थकचा खून झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT